२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान

अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे. 

Updated: Apr 23, 2015, 10:22 PM IST
२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे. 

अहेरी तालुक्यात ८३ पथके बेस कॅम्पला रवाना झाले आहेत. अहेरी उप विभागात या निवडणुकांसाठी ४ हजार सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ज्यात CRPF च्या १२ कंपन्या  SRPF च्या ५ कंपन्यांचा समवेश आहे. 

यासह गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष नक्षलविरोधी पोलिस पथकाची १३ पथके , होमगार्ड , वनविभागाचे पथक आदींचा समावेश आहे. दक्षिण गडचिरोलीतील अतिसंवेदनशील कमलापुर गावात नक्षल्यांनी पत्रके व कापडी फाळके लावून या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. 

ग्रामस्थांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शासनाने तयार केले पोस्टर्स दूर जंगलात पडून असलेले आढळून आले आहेत. दरम्यान आम्ही सज्ज आहोत असे प्रशासनाचे मत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.