जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान

जळगाव जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला, नव्हता पण मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने, पुरात मोठे नुकसान झाले आहे.

Updated: Jun 29, 2016, 12:01 PM IST
जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान title=

जळगाव : जळगाव जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला, नव्हता पण मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने, पुरात मोठे नुकसान झाले आहे.

सातपुडा परिसरात पावसाने सर्वात जास्त झोडपून काढलं आहे, यात चोपडा आणि अमळनेर तालुक्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

काम एवढं कमकुवत की पुलाचे कठडेच वाहून गेले

चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात पुराचे पाणी शिरले आहे. तर काही रिक्षा वाहून गेल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. काजीपुरा (ता. चोपडा) येथील पुलाचे आजू बाजूचे कठडे वाहून गेले आहेत. त्यामुळे शिरपूरकडील बसच्या (एसटी) फेऱ्या बंद झाला आहे.

अमळनेर तालुक्यात सुटवा नाल्याच्या पुरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अमळगाव गावातही पूरसदृश्य परिस्थिती असल्याचं सांगण्यात येत आहे.

चोपडा-शिरपूर हा रस्ता बंद झाला आहे, कारण एका ठिकाणी पुराच्या पावसात रस्त्याच वाहून गेला आहे.

चहार्डी गावात मोठे नुकसान

सातपुडा डोंगररांगेत पडलेल्या पावसामुळे चंपावती आणि रत्नावती नद्यांना मोठा पूर आला. चोपडा तालुक्यातील चहार्डी गावाजवळ त्यांचा संगम होते. त्या संगमापुढे बंधाऱ्यात कचरा अडकल्याने गावात पाणी शिरले. यात गावातील पान टपऱ्या, बैलगाड्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ११ रिक्षा वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच येथील मंदिरेही अर्धी पाण्याखाली गेली आहे.