पुण्यात कडक उन्हामुळे प्राण्यांसाठी ठंडा ठंडा, कुल कुल व्यवस्था

राज्यात उन्हाचे चटके बसत आहेत. याची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. त्यांना उन्हाच्या चटक्यापासून वाचविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडा थंडा...कुल कुलसाठी खास प्रयत्न केले गेले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2017, 02:55 PM IST
पुण्यात कडक उन्हामुळे प्राण्यांसाठी ठंडा ठंडा, कुल कुल व्यवस्था title=

पुणे : राज्यात उन्हाचे चटके बसत आहेत. याची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. त्यांना उन्हाच्या चटक्यापासून वाचविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडा थंडा...कुल कुलसाठी खास प्रयत्न केले गेले आहेत. 

वाघ - सिंह आणि बिबट्यांना कुलर्स तर अस्वलाला आईस केक. उन्हाच्या झळांपासून थंडावा मिळण्यासाठी पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
 
कात्रज येथे महापालिकेचं प्राणी संग्रहालय आहे. वाढत्या तापमानाचा त्रास प्राण्यांनाही होतो. त्यात काही प्राणी नैसर्गिकरित्या पुण्याच्या वातावरणात वाढणारे नाहीत. त्यामुळं उन्हाळ्यात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच अस्वलाच्या खाण्यात फ्रूट आईस केक देण्यात येतो. तर, सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी फॉगर्स बसवण्यात आले आहेत.
 
फॉगर्स, स्पिकलर्स आणि कुलरमुळे प्राण्यांना गारवा मिळतो. असं प्राणी संग्राहलयाच्या अधिकार्यांनी सांगितलं. हत्तींना देखील दिवसातून तीन वेळेस आंघोळ घालण्यात येते, अशी माहिती उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली.