उद्योजकतेला वाव देण्यासाठी 'मेक इन नाशिक'चा नारा

उद्योगविश्वाला लागलेलं ग्रहण सोडवण्यासाठी मेक इन नाशिकचा नारा देण्यात आला आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर नाशिकमधल्या उद्योजक संघटनांच्या माध्यमातून, मुंबईमध्ये मे महिन्यात नाशिक शहरातल्या उद्योगांच्या विविध संधींचं सादरीकरण केलं जाणार आहे. या माध्यमातून बड्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. 

Updated: Apr 2, 2017, 11:17 PM IST
उद्योजकतेला वाव देण्यासाठी 'मेक इन नाशिक'चा नारा title=

नाशिक : उद्योगविश्वाला लागलेलं ग्रहण सोडवण्यासाठी मेक इन नाशिकचा नारा देण्यात आला आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर नाशिकमधल्या उद्योजक संघटनांच्या माध्यमातून, मुंबईमध्ये मे महिन्यात नाशिक शहरातल्या उद्योगांच्या विविध संधींचं सादरीकरण केलं जाणार आहे. या माध्यमातून बड्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. 

उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींच्या नजरा मेक इन नाशिककडे लागल्या असताना काही उद्योजकांना मात्र मेक इन नाशिकच्या यशस्वितेबाबत साशंकता वाटतेय. त्याला कारण आहे ती नाशिक शहरात असलेल्या सुविधा आणि सरकारी सेवांची वानवा. 

नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्यामुळे मेक इन नाशिकचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच वाढविण्याची खेळी नाशिकच्या उद्योजकांनी खेळली आहे. त्यामुळे मेक इन नाशिकला कसा प्रतिसाद मिळतो, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती काय शुभ संकेत घेऊन येते, यासाठी एक महिना वाट बघावी लागणार आहे.