धुरामुळे 'त्या'चं ठरलेलं लग्न मोडलं

कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पण या आगीचा सर्वात जास्त फटका बसलाय इथं रहाणा-या अमोल जोशी नावाच्या तरुणाला. 

Updated: Jun 11, 2016, 01:21 PM IST
धुरामुळे 'त्या'चं ठरलेलं लग्न मोडलं title=

कल्याण : कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पण या आगीचा सर्वात जास्त फटका बसलाय इथं रहाणा-या अमोल जोशी नावाच्या तरुणाला. 

डंपिंग ग्राऊंडला लागणा-या आगीमुळे आणि त्यामुळे निर्माण होणा-या धुरामुळे अमोलचं ठरलेलं लग्न मोडलंय. 

अमोलला लग्नासाठी सांगून आलेल्या मुलीनं लग्नासाठी एक अट घातली ती म्हणजे इथून दुसरीकडे घर घेण्याची. या विचित्र अटीनं या भागातले अमोल सारखे तरुण चक्रावून गेलेत.