मोदी, जेटलीनंतर मुख्यमंत्री बारामतीच्या प्रेमात

आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Updated: Nov 6, 2015, 04:13 PM IST
मोदी, जेटलीनंतर मुख्यमंत्री बारामतीच्या प्रेमात title=

 बारामती, पुणे : आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

पवारांच्या कृषी विकास प्रतिष्ठानने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेय. त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, पवार-विरोधकांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभालाही मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते. पण 15 दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला येणे त्यांनी टाळले होते.

स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहीतेचे कारण फडणवीस यांनी पुढे केलं. आज मात्र दिल्ली दौरऱ्यातून वेळ काढून मुख्यमंत्री पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहिलेत. पवारांच्या निमंत्रणावरून झालेल्या बारामती भेटीत मोदी आणि जेटली यांनी शरद पवारांवर स्तुती सुमनं उधळली होती. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष लागले होते.
 
कृषी क्षेत्रात काही ठिकाणी विकासाची बेटं तयार झाली आहेत. तर, मोठा भाग उपेक्षित राहिलेला आहे. फक्त विकासाची बेटं तयार करुन चालणार नाही तर, उपेक्षित राहिलेल्या भागाला पुढं कसं नेता येईल यासाठी काम करायला हवं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.