पुणे : तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरावी असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात तरुणांना दिला. पुणे पोलिसांच्यावतीने आयोजित 'ऑन लाईन तरुणाई' या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी तरुणाईशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्य़ा वैयक्तीक आठवणी शेअर केल्या.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात झाला तो प्रकार चुकीचा आहे. मात्र, झाले ते चुकीचे पण असे का झाले, याचा विचार करा, असे नाना पाटेकर म्हणालेत.
एखादा नेता निवडणूक जिंकतो. वर्षभरात लाखो-करोडोंची मालमत्ता जमवतो. मात्र, त्याच्याकडे ही मालमत्ता कोठून आली, याचा जाब विचारला जात नाही, अशी खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
भ्रष्टाचारी राजकारण्यांना आपण तरुणच धडा शिकवू शकतो. तेव्हा मूठभर राजकारण्यांचा भूलथापांना बळी न पडता समाजात प्रेम, आपलेपणाची भावना निर्माण व्हावी आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन एकमेकांना आधार, विश्वास द्यावा, असे नाना पाटेकर म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.