कुंभपर्वाची अखेरची पर्वणी, साधू-महंतसह लाखो भाविकांची डुबकी

एकादशी आणि प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात आज शुक्रवारी शैवपंथीय साधू-महंत व लाखो भाविकांनी शेवटच्या शाही स्नानाची पर्वणी साधली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय  पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ३.४० वाजता प्रथम जुन्या आखाड्याची मिरवणुकीला सुरुवात झाली.  त्र्यंबक येथे ८ आखाड्यांचे स्नान पूर्ण झाले आहे. लाखो भाविकांनी डुबकी मारली.

Updated: Sep 25, 2015, 09:49 AM IST
कुंभपर्वाची अखेरची पर्वणी, साधू-महंतसह लाखो भाविकांची डुबकी title=

नाशिक : एकादशी आणि प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात आज शुक्रवारी शैवपंथीय साधू-महंत व लाखो भाविकांनी शेवटच्या शाही स्नानाची पर्वणी साधली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय  पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ३.४० वाजता प्रथम जुन्या आखाड्याची मिरवणुकीला सुरुवात झाली.  त्र्यंबक येथे ८ आखाड्यांचे स्नान पूर्ण झाले आहे. लाखो भाविकांनी डुबकी मारली.

शाही मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी शाही मार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-संतांचे स्वागत केले. आत्ताप्रर्यंत जूना दशनाम, निरंजनी, आनंद, अग्नी, जुना, आवाहन, निर्मोही, महानिर्वाण आणि अटल आखाड्याचे शाही स्नान झाले. तर निर्वाणी  व बडा उदासीन आखाडा  यांचे शाही स्नानाला सुरुवात झाली होती. नागासाधू, गोल्डनबाबा हे विषेश आकर्षण ठरत आहेत. 
 
कुंभमेळ्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास सात हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तैनात करण्यात आले आहेत. कुशावर्त तीर्थ, मिरवणूक मार्ग व इतर महत्वपूर्ण ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. 
 
दरम्यान, पहाटेच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये कुशवर्त येथे पोहोचले त्यांच्यासोबत विजय भटकर, गिरीश महाजन, सुधींद्र कुलकर्णी उपस्थित    होते. कैलास मान सरोवरतील तीर्थ मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यम्बंकच्या कुशवर्तत जलार्पण केले गेले. त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या शाही स्नानसाठी मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी दिसून येत होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.