संगमनेर: महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संगमनेर जवळील राजापूरमध्ये ही घटना घडलीये.
एका फलक उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले असता बाळासाहेब थोरात यांच्यावर एका तरुणानं शाई फेकण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यात बाळासाहेब थोरातांना कोणत्याही प्रकारची ईजा झालेली नाही.
थोरात गाडीत बसत असताना हा सर्व प्रकार घडला. दरम्यान शाईफेक करणारा भाऊसाहेब हासे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. वाकचौरेंवर झालेल्या हल्ल्यातही भाऊसाहेब हासेचा समावेश होता अशी माहिती मिळते आहे.
यापूर्वी हसन मुश्रीफ, त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि आता बाळासाहेब थोरातांवर शाईफेक करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शाई फेक झाल्यानं राजकीय असहिष्णूता वाढल्याचं लक्षण असल्याचं समोर येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.