औरंगाबाद: धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या अंतरिम जामिनाला स्थगिती मिळालीय. औरंगाबाद खंडपीठानं ही स्थगिती दिलीय. त्यामुळं धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.
शिवाय धनंजय मुंडेंना अटक करण्यासाठी पोलिसांना मुभा दिली आहे. त्यामुळं मुंडेंना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. संत जगन्मित्र सूतगिरणी प्रकरणी परळी पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळं आता धनंजय मुंडेंना अटक झाली, तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची नाचक्की होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता यातून धनंजय मुंडे कशा रितीनं मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.