अपहृत मुलाची १२ तासात सुटका

वसई पूर्वेकडील वाकीपाडा येथून अकरा वर्षाच्या मुलाचे तीन लाख रुपयासाठी अपहरण झालेल्या मुलाची १२ तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Jul 26, 2015, 09:52 PM IST
अपहृत मुलाची १२ तासात सुटका title=

वसई : वसई पूर्वेकडील वाकीपाडा येथून अकरा वर्षाच्या मुलाचे तीन लाख रुपयासाठी अपहरण झालेल्या मुलाची १२ तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

शिवकुमार उर्फ़ छोटू गंगाराम मौर्या वय १९ आणि अमित जयप्रकाश जैस्वाल वय २३ या आरोपींना अटक करण्यात आले आहे. या दोघांनी वसई पूर्वेकडील वाकीपाडा येथील कैलास बिल्डींग मध्ये राहणा-या आदर्श गोविंद चव्हाण या अकरा वर्षाच्या मुलाचे राहत्या घरातूनच २५ जुलै रोजी पहाटे तीन वाजता अपहरण केले होते.

त्या सोबतच घरातील एक मोबईल पण घेवून गेले होते. अपहरणकर्त्या आरोपी पैकी छोटु हा त्यांच्याच इमारतीमधील रहिवाशी आहे. सकाळी सहा वाजता मुलाची आई ऊठली तेव्हा मुलगाही नाही आणि मोबाईल ही नाही. हे कळाल्यावर मुलाच्या आईने त्या मोबाईलवर फ़ोन केला तर स्वत: आदर्शने उचलला आणी सांगितले की, मला एक अंकल भेटले आहेत.  त्यांनी मला कुठे घेवुन आले हे माहित नाही. एवढ्यात अपहरणकर्त्या छोटूने त्याच्या मोबाईल हिस्कावुन घेवुन त्याच्या आईला धमकी दिली आणि सांगितले की, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. तीन लाख रुपये आणून द्या अन्यथा त्याला मारून टाकण्यात येईल. अपहरण कर्त्याच्या धमकीने हतबल झालेल्या कुटुंबियानी तात्काळ वालिव पोलिस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 

आदर्शच्या जवळ असणा-या मोबाईलचे लोकेशन घेवुन वालिव पोलिसांनी तात्काळ दोन लाख रुपयाची व्यवस्था केली. आणी ते एका बॅगमध्ये भरुन दोन विशेष पथकासह आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी हे मोबाईल वरुन केव्हा नायगाव, केव्हा विरार, केव्हा अर्नाळा याठिकाणी पैसे आणू द्या असे सांगत होते त्याप्रमाणे वालिवचे तपास पथक आरोपीच्या मागावर फ़िरत होते. शेवटी विरारच्या एका ठिकाणी सांगितल्या प्रमाणे पोलिसांनी पैशाची बॅग ठेवली.  पैसे नेण्यासाठी दोन्ही आरोपी येताच दोघांनाही पोलिसांनी बारा तासाच्या आत रंगेहाथ ताब्यात घेतले. परंतु त्यांच्या सोबत मुलगा नव्हता. त्याचे बरेवाईट तर झाले नाहीना या भीतीने पोलिसांनी अतिशय चलाखीने एका रूम मध्ये ठेवलेल्या मुलाला आरोपींना सोबत नेवून सुखरुप आपल्या ताब्यात घेवुन त्याच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.