नांदेड : औरंगाबादमध्ये शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता मुक्कामाला आलेल्या राधे माँ रात्री एक वाजता आपल्या भक्तांच्या गराड्यात औरंगाबादमधून पळून गेल्या. मात्र पळताना राधे माँ पडली सुद्धा. त्यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांना खांद्यावर घेऊन तिथून पळ काढला.
कोणाशी काहीही न बोलता राधे माँ औरंगाबादमधल्या हॉटेल मेडोजमधून, अलिशान जग्वार गाडीतून पसार झाला. त्या नांदेडकडे रवाना झाल्याचं सांगितलं जातंय. त्यापूर्वी रात्री मीडियाशी बोलण्यासाठी आलेल्या राधे माँला अचानक रडू कोसळलं.
दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी दुपारी ३ तास राधे माँ ची चौकशी केली. त्यांच्यावार असलेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी चौकशी केली. राधे माँवरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्यांचे अत्यंत जवळचे भक्त संजीव गुप्ता यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.