राज ठाकरे यांच्या स्वप्नातलं नाशिकातील वन उद्यान

गोदापार्कपाठोपाठ आता नाशिकच्या वन उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नातलं वन उद्यान कसं साकारणार. हा खास रिपोर्ट.

Updated: Sep 4, 2015, 11:28 PM IST
राज ठाकरे यांच्या स्वप्नातलं नाशिकातील वन उद्यान title=

नाशिक : गोदापार्कपाठोपाठ आता नाशिकच्या वन उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नातलं वन उद्यान कसं साकारणार. हा खास रिपोर्ट.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची सांगता झाली. या दौऱ्यात नाशिककरांसाठी आणखी एक गिफ्ट देण्याची ग्वाही राज ठाकरेंनी दिलीय. वन उद्यानाची. मुंबई-आग्रा महामार्गावरील नेहरू उद्यानातल्या विविध कामांचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते झालं. वन विभागाच्या मालकीच्या जागेतील या उद्यानाचा पर्यटनकेंद्र म्हणून विकास करण्याचं त्यांचं स्वप्न आहे.

अधिक वाचा : राज ठाकरे यांनी उड़वली मुख्यमंत्रांची खिल्ली

हा प्रकल्प नेमका कसा असेल?
- हा प्रकल्प टाटा ट्रस्टच्या सहभागातून साकारण्यात येणार आहे.
- ४ ते ५ किलोमीटरचा सायकल ट्रॅक हे तिथलं मुख्य आकर्षण असणार आहे.
- सध्या माउंट बायकिंगची क्रेझ असल्यानं त्या धर्तीवर इथे सायकल ट्रॅक साकारला जाणार आहे.
- लहान मुलांसाठी विशिष्ट प्रकारचा तलाव बनवण्यात येणार आहे.

अधिक वाचा : राज ठाकरे यांनी घेतली नारायण राणेंची भेट
 
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं वन खात्याचं मंत्रीपद आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. पुढच्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. नाशिक, मुंबईसह इतर शहरातल्या महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.