राज ठाकरेंचे ड्रीम गोदा पार्कचं काम रखडणार ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गोदापार्क प्रकल्प पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. या वेळी कारण ठरलेत हरित लवादाचे आदेश. त्यामुळे  राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात आहे ?

Updated: Feb 13, 2015, 11:56 PM IST
राज ठाकरेंचे ड्रीम गोदा पार्कचं काम रखडणार ? title=

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गोदापार्क प्रकल्प पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. या वेळी कारण ठरलेत हरित लवादाचे आदेश. त्यामुळे  राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात आहे ?
 
औष्णिक विद्युत प्रकल्पापासून शंभर किलोमीटरच्या परिसरात कुठलंही बांधकाम फ्लाय ऍशच्या विटांपासून करणं बंधनकारक आहे. राज साहेबांचा नाशिकमधला ड्रीम प्रोजेक्ट मात्र त्याला अपवाद ठरलाय. रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून साकारण्यात येणा-या गोदापार्कचं बांधकाम सर्रासपणे लाल मातीच्या विटांनी होतंय.

कोर्टाचा अवमान झाल्यावरही नाशिक महापालिका प्रशासन कागदोपत्री घोडे नाचवण्यात दंग आहे. याबाबतीत चौकशी करूस असं पठडीतलं उत्तर दिलं जातंय. गोदापार्कसह गोदाकाठावर लाल मातीच्या विटांच्या माध्यमातून सुरु असणा-या बंधाकामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश हरित लवादाने सार्वजनिक बांधकाम विभागला दिलेत. पुढचं सगळं त्या अहवालावर अवलंबून आहे. पण बांधकाम करताना महापालिकेला हे माहीत नव्हतं का, हा प्रश्न आहे..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.