राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अनेक विषयांवर आपल्या ठाकरी शैली तोफ डागली. राज-उद्धव एकत्र येणार ही अफवा, भाजप सरकारही काँग्रेस प्रमाणेच, राष्ट्रवादीचे जातीचं राजकारणे, राज्य-केंद्र सरकारला दंगली भडकवायच्या आहेत, सलमान खानला अक्कल नाही, अशा अनेक विषयांवर त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 

Updated: Aug 10, 2015, 09:02 PM IST
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे  title=

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अनेक विषयांवर आपल्या ठाकरी शैली तोफ डागली. राज-उद्धव एकत्र येणार ही अफवा, भाजप सरकारही काँग्रेस प्रमाणेच, राष्ट्रवादीचे जातीचं राजकारणे, राज्य-केंद्र सरकारला दंगली भडकवायच्या आहेत, सलमान खानला अक्कल नाही, अशा अनेक विषयांवर त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 

- राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणाऱ्या केवळ अफवा होत्या - राज ठाकरे 

- राज-उद्धव यांना भैय्यू महाराज एकत्र करणार, आम्ही काही कणिक आहोत का? - राज ठाकरे 

- बातम्यांमध्ये बदल झाला नाही, मुख्यमंत्री ज्या घरात जाऊन राहिले त्या शेतकऱ्यांच्या घरातील महिलेने आत्महत्या केली. काय जाऊन बोलले माहित नाही. ते म्हटले असतील आमच्याकडून काही होणार 

- टोलचा प्रश्न तेव्हाही होता आताही आहे.... नुसते थोबाडं बदलली... 

- आमचे शिक्षणमंत्री वजनकाटा घेऊन दप्तराचं ओझं मोजताहेत... शैक्षणिक ओझं हे त्यांना समजत नाही. 

- चांगले रन काढण्याच्या ऐवजी 'चिक्की' रन काढताहेत - राज ठाकरे 

- एका खात्यात अंतर्गत बदल्यांसाठी १०० कोटी रुपये घेतले गेले. तेही भ्रष्टाचारी होते हेही भ्रष्टाचारी आहे. 

- मुख्यमंत्री चांगला माणूस.. चांगल काम करतो आहे. त्यांचेही हातपाय बांधून ठेवले आहे. त्यांचा आकार पाहता... त्यांना हातपाय बांधून ठेवण्याची गरज नाही. टीव्हीवर पाहताना पाहिले की कधी पडतील 

- जाती-पातीच्या गोष्टींना पवार पाठिशी घाततात. हे ठाण्याचं वळवळतंय... ज्या माणसांनी छत्रपतींसाठी आयुष्य घातलं त्यांना एकेरीने हाक मारतात हे 

- छत्रपतींविषयी चर्चा करण्याऐवजी जाती-पातीचं विष घोळताहेत... 

- राष्ट्रवादी नावाचा पक्ष जन्माला आला त्या दिवशी जातीपातीचं राजकारण सुरू झालं. यापूर्वी होतं पण आता ते उघड करताहेत. 

- टिळक, सावरकर ब्राम्हणांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्य़ांचे महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे... अशी विभागणी करू दिली आहे... दुसऱ्यांनी यांची पूजाच करू नये. 

- ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला तो महाराष्ट्र खितपत पडले आहे. 

- मला कोण कुठल्या जातीचा हा फरक पडत नाही. महाराष्ट्रासाठी झटतात, तुम्ही माझे आहात. 

- मी बाबासाहेब पुरंदरेंना या प्रकरणानंतर भेटलो, त्यांना काय वाटतं असेल या वयात... 

- मराठी ही राज भाषा हे ५५ वर्षांनी कळाले. अरे महाराष्ट्राची राजभाषा मराठी... 

- सरकार बदल तरी काही फरक पडलेला नाही. तुम्ही यासाठी जागं राहिलं पाहिजे. 

- माझे आजोबा म्हटले होते की, जिथे अन्याय दिसला तिथे लाथ मारा. काय होईल केसेस दाखल होतील. सरकार आलं तर काढू टाकू... 

- ठाण्यात रिक्षा, टॅक्सीचे परवाने देत आहेत. आपले तहसीलदार खोटे परवाने देत आहेत. कुंपणच शेत खातं आहे. 

- आपण हसतो म्हणून हे माजतात. हा प्रश्न उत्तर प्रदेश बिहार नाही. ३०-४० टक्के लोक बांगलादेशातून आले आहात.... 

- रिक्षा, टॅक्सीचे बॅच आल्यावर ते या देशाचे नागरिक होतील त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. 

- जे काँग्रेस करतं ते भाजप करतो. भाजप कार्यकर्ते खोटी आधारकार्ड वाटताहेत मनसेने पकडली. 

- उद्या कोणाच्या रिक्षात बसत आहोत ते आम्हांला माहित नाही. 

- याकूब मेमन याला फाशी दिली आहे. त्याचा तमाशा बनवून ठेवला. काय पण आमची न्यायालयं २२ वर्षांनी निकाल लागतो. 

- राज्य सरकार आणि केंद्र सरकारला या देशात दंगली घडवायच्या आहे. 

- महेश भट भिकारडा, नसरुद्दीन शहा यांनी वेन्सडे चित्रपटात वेगळी भूमिका केली त्यांनी मग काय झालं... 

- सलमान खान बे अक्कल, त्याला काही अक्कल नाही. वडिल कुठे, तू कुठे, वडील, सलीम साहेब आदर करणारा माणूस... रात्री दोन अडीच वाजता का ट्विट केले, कळाले नाही... 

- अपघाताच्या वेळी सलमानच्या घरी त्यांच्या वडिलांना भेटायला गेलो होतो. सलीम खान यांचे माझे जुने संबंध. त्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली होती. 

- याकूब मेमनच्या प्रकरणात सलमानने वक्तव्य दिलं, अशा बाबतीत मी मैत्री धरत नाही. 

- निवडणुकांच्या तोंडावर लोकांची माथी भडकविणारी ही माणसे... ते दोन भाऊ ओवेसी.... 

- वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. 

- ओवेसीने मोर्चा काढला होता, त्याला आपण उत्तर दिलं होते. सर्व जण नंतर जागे झाले होते. 

- महाराष्ट्रात वेडं वाकडं घडविण्याचा प्रयत्न केला, तर राज ठाकरेशी गाठ आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढले. 

- याकूबच्या केसला २२ वर्ष लावतात, गणपती, दहिहंडी निर्णय फट्याक...

- दहिहंडी २२ फुटांची करायची, घरात फोडायची... 

- सलमानच्या अपघाताची केस १२ वर्ष... काय तपासताहेत.. 

- मोदींनाही बोलताहेत नाही, काय मन की बात.. मनमोहन सिंगानंतर हे बोलत नाही. 

- नरेंद्र मोदी खरं बोललं तर शेवटची आशा आहे... 

- काही भागात गुजराती माणसांना फेफरं भरलं आहे... तुला नाही जमत तर घरी बस... ही सुरूवात दक्षिण मुंबईतून झाली. सर्व ऩॉनव्हेजची हॉटेल्स बंद केली... 

- नव्या कंपन्या आणल्या तर त्या ठिकाणी माझी मराठी मुलं-मुली लागल्या पाहिजे. 

- आपली सत्ता रस्त्यावर - राज ठाकरे 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.