नागपूर : नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी सुरू झालीय नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.
रामटेक नगरपालिकेत शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. रामटेकमध्ये 13 नगरसेवकांसह भाजपचा नगराध्यक्षचा विजय झालाय. भाजपला 13 जागांवर विजय मिळालाय. तर शिवसेना 2, काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळालाय.
नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप देशमुख विजयी झालेत. या ठिकाणी शिवसेनेला बंडखोरीमुळे मोठा फटका बसला. शिवसेनेकडून भाजपने सत्ता मिळवलीये. भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आपली नगरपालिका जिंकली.