नागपूर आणि गोंदियामध्ये आज मतमोजणी

 नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी आज होत आहे. नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.

Updated: Jan 9, 2017, 08:51 AM IST
नागपूर आणि गोंदियामध्ये आज मतमोजणी title=

नागपूर : नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी आज होत आहे. नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नागपुरातल्या नगरपालिकांमध्ये सरासरी 60 टक्क्यांहून जास्त मतदान झालं आहे. तर गोंदियामध्ये सुमारे 75 टक्के मतदान झालंय. त्यामुळे मतदाराजानं आपला कौल नेमका कोणाला दिला आहे, ते आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.