मोडलेल्या लग्नाची पोलिसांत तक्रार; जातपंचायतीनं केलं बहिष्कृत

राज्यात काही ठिकाणी जातपंचायती कायमच्या बंद दोत असताना काही भागात मात्र अजूनही जातपंचायतीचा अत्याचार सुरुच आहे. मुलीच्या मोडलेल्या लग्नाबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले म्हणून एका कुटुंबाला जातपंचायतीनं समाजातून बहिष्कृष्त केलंय. 

Updated: Mar 18, 2015, 07:11 PM IST
मोडलेल्या लग्नाची पोलिसांत तक्रार; जातपंचायतीनं केलं बहिष्कृत title=

औरंगाबाद : राज्यात काही ठिकाणी जातपंचायती कायमच्या बंद दोत असताना काही भागात मात्र अजूनही जातपंचायतीचा अत्याचार सुरुच आहे. मुलीच्या मोडलेल्या लग्नाबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले म्हणून एका कुटुंबाला जातपंचायतीनं समाजातून बहिष्कृष्त केलंय. 

औरंगाबादमधील जामठी गावात ही घटना घडलीय. काही दिवसांपूर्वी  सीताराम राठोड यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं... साखरपुडाही झाला... लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना या मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या गावातल्या एका तरुणानं तिच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण केला... हेच ठरलेलं लग्न मोडण्याचं निमित्त ठरलं... आणि लग्न मोडलंही... 

हाच सारा प्रकार पोलिसांसमोर राठोड यांनी कथन केला. मात्र, ही बाब जातपंचायतीला खटकली आणि त्यांनी जातपंचायत बसवून राठोड यांच्यास तीन भावांना बहिष्कृत केलं गेलं. 

जातपंचायतीनं राठोड कुटुंबीयांवर केलेला हा अन्याय म्हणजे काही पहिला प्रकार नाही. याआधीसुद्धा जातपंचायतीनं अन्याय केल्याचं सीताराम राठोड यांच्या आई सांगतात... तर लग्न, साखरपुडा समारंभात जातपंचायतीची मनधरणी करावी लागते. इतकंच नाही तर देवाच्या नावाने जातपंचायतीला पैसे दिल्याचंही राठोड कुटुंबीय सांगतात.

याबाबत, पोलिसांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस उपअधीक्षक राम मांडुरके यांनी जातपंचायतच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढलाय. 

एकीकडे वैदू समाजानं जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, आजही जातपंचायतीचे भूत कायम आहे. राठोड यांच्यासारख्या व्यक्ती समोर आल्यानंतरच हे प्रकार उघड होतात.. त्यामुळं या जातपंचायतींना मूठमाती देण्यासाठी एकजुटीनं लढा देण्याची गरज निर्माण झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.