राज्यात पावसाचा तडाखा, अतिवृष्टीचा इशारा

दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा प्रसन्न झालाय. मराठवाड्यात आज पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, बीड, परभणी आणि उस्मानाबाद परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. कोकणातही चांगला पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 3, 2012, 07:18 PM IST

www.24taas.com,मुंबई
दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा प्रसन्न झालाय. मराठवाड्यात आज पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. कोकणातही चांगला पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद, बीड, परभणी आणि उस्मानाबाद परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबादमध्ये बरसणा-या पावसामुळं दुबार पेरणी केलेल्या शेतक-याला फायदा होणारय. असं असलं तरी पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं मोठ्या पावसाची गरज आहे.
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातल्या अंबाजोगई, परळी, माजलगाव तालुक्यात नदी-नाले तुडुंब भरून वाहतायत. जोरदार कोसळणा-या पावसामुळं परभणीकरांनाही दिलासा मिळालाय. मोठ्या विश्रांतीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातही रात्रीपासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.
रायगड जिल्ह्याच्या कर्जत-खालापूर-पाली-सुधागड या तालुक्यांना पावसानं काल रात्रीपासून चांगलच झोडपून काढलय. या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालय. तर आज शिरवली गावाजवळ झाड पडल्यानं चार तास वाहतूक ठप्प होती.
दरम्यान या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसलाय. सखल भागातली भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नुकसानीचा धोका संभवतो. पाताळगंगा, अंबा, उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी पूर्णपणे ओलांडल्याने प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय, असाच पाउस सुरु राहिला तर धोकादायक परिस्तिथी निर्माण होऊ शकते.
दिवसभर शहरात सरी कोसळतायत. पावसाचा जोर कमी असला तरी संततधारेमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय़. मराठवाड्यातल्या या पावसामुळं आभाळाकडं डोळे लावून बसलेल्या शेतक-यांचा जीव भांड्यात पडलाय.. कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावलीय. सातारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असला तरी सांगलीतल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसानं अजून दडी मारलीय.
लातूर जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलय.. रेणापूर तालुक्यात पानगाव आणि कारेपूर येथे ढगफुटी झाली असून, या ठिकाणी २००मिमीहून अधिक पाऊस झालाय.. तर जिल्ह्यातले ४ तालव पाणी वाढल्यानं फुटले आहेत.. रेणापूरच्या नदीला पूर आला असून, रेणापूर पानगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय. तर २० ते २५ गावांचा संपर्कही तुटलाय.तर पावसामुळे ५ जनावरांचाही मृत्यू झालाय.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसानं जोर धरलाय. औरंगाबादसह संपूर्म मराठवाड्यातच पास जोरदार बरसतोय.. दुबार पेरणी केलेल्या शेतक-यांना या पावासाचा फायदा होणार आहे.. मात्र पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं अजूनही मराठवाड्याला मोठ्या पावसाची गरज आहे.
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातल्या अंबाजोगई, परळी, माजलगाव तालुक्यात नदी-नाले तुडुंब भरून वाहतायत. या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झालाय. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतर अंबाजोगाईसह परळी आणि केज तालुक्यात रविवारी अतिवृष्टी झाली. अवघ्या २४ तासात रविवारी महसूल मंडळात ९० मी.मी.इतका पाऊस झाला.
या भागातल्या नद्या,नाले,ओढे ओसंडून वाहतायत. तर लातूर जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. रेणापूर तालुक्यातल्या पानगाव-कारेपूर भागात एका रात्रीत २०० मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. रेणा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळं २५ गावांचा संपर्क तुटलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतायत.
परभणी जिल्ह्यात पूर्णामध्ये संततधार पावसानं पोलीस चौकीची भींत कोसळलीय. त्यामध्ये ३ पोलीस जखमी झालेत. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. छत कोसळत असताना दोन पोलिसांनी आपली सुटका करुन घेतली. मात्र एकजण आतमध्ये अडकला होता. दोन पोलिसांच्या मदतीनं त्यानंही आपली सुटका करुन घेतली. चौकी मोडकळीस आली होती. त्यामुळं पोलीस चौकी तिथून तात्काळ हलवणं गरजेचं होतं. मात्र ते गांभीर्यानं घेतलं गेलं नाही. निधी नसल्याचं धक्कादायक कारण रेल्वे पदाधिका-यांनी दिलंय.