वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या प्रणव धनावडे याला पोलिसांची मारहाण

वर्ल्ड रिकॉर्ड करणारा युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याला पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.  मैदानात हेलिपॅड बांधण्यात येत होते. याला प्रणव याने विरोध केल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याचे वडील आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Updated: Dec 17, 2016, 09:00 PM IST
वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या प्रणव धनावडे याला पोलिसांची मारहाण title=
सौजन्य - फेसबुक

मुंबई : वर्ल्ड रिकॉर्ड करणारा युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याला पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.  मैदानात हेलिपॅड बांधण्यात येत होते. याला प्रणव याने विरोध केल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याचे वडील आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये  नाबाद १००० रन्सचा  वर्ल्ड रिकॉर्ड  केल्यानंतर प्रणव धनावडे प्रकाश झोतात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी कल्याण येथे मैदानावर बांधण्यात येणाऱ्या हेलिपॅडला प्रणव याने विरोध केला. दरम्यान, या विरोधामुळे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्याने केलाय.

दरम्यान, प्रणव धनावडे मारहाण प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सावध पवित्रा घेतला आहे. मैदानावर हेलिपॅड बांधणं चुकीचे, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कल्याण येथील कार्यक्रमाला मी कारने जाणार, असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.