सायडिंगला असलेल्या लोकलची झाली 'द बर्निंग लोकल'!

बदलापूर स्टेशनला सायडिंगला असलेल्या लोकलला आज  एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडायला आणखी एक कारणच मिळालंय. 

Updated: Nov 25, 2014, 05:57 PM IST
सायडिंगला असलेल्या लोकलची झाली 'द बर्निंग लोकल'! title=

बदलापूर: बदलापूर स्टेशनला सायडिंगला असलेल्या लोकलला आज  एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडायला आणखी एक कारणच मिळालंय. 

गेल्या एक महिन्यापासून ही लोकल बदलापूर स्थानकात कर्जत दिशेकडे सायडिंगला उभी होती. या लोकलच्या  एका डब्ब्यानं पेट घेतल्यानंतर दुसरा डब्बाही आगीच्या भक्षस्थानी आला. दरम्यान लगेच बदलापूर अग्निशमनदलानं घटना स्थळी धाव घेत आग आटोक्यात आणायचे प्रयत्न सुरु केले आहेत.

या आगीमुळं मध्य रेल्वेच्या कर्जत आणि मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचं वेळापत्रक काहीसं कोलमडलं असून अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आहे. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.