युग चांडक हत्या प्रकरणाचा आज निकाल

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज निकल येण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 28, 2016, 11:33 AM IST
युग चांडक हत्या प्रकरणाचा आज निकाल title=

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज निकल येण्याची शक्यता आहे.

१ सप्टेंबर २०१४ ला नागपूरच्या छाप्रू नगर परिसरातील एका उच्चभ्रू परिवारातील ८ वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि खून करण्यात आला होता. संपूर्ण नागपुरात खळबळ माजवणारी ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. 

युग चांडकला त्याच्या राहत्या घरासमोरूनच दोन अपहरणकर्त्यांनी पळवले होते. शहरातील नामवंत दंत चिकित्सक डॉ मुकेश चांडक यांचा तो मुलगा होता.  

या प्रकरणात पोलिसांनी राजेश सारवे आणि अरविंद सिंह या दोन आरोपींना अटक केली होती. दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. यापैंकी राजेश सारवे हा डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमध्ये  अगोदर काम करत होता. कामादरम्यान मागे झालेल्या वादातूनच त्याने बदल घ्यायचे ठरवले आणि अरविंद सिंहच्या मदतीने हा खून घडवून आणला. 

या घटनेने शहरात तीव्र संताप व्यक्त झाला होता. अनेक ठिकाणी या संबंधी निदर्शने आणि शोक सभा घेण्यात आल्या होत्या. नागपूरच्या जिल्हा न्यायालयात आज या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे.