मुंबई मेट्रोचे नवीन दर ९ जुलैपासून लागू

 रेल्वे भाडेवाढीमुळं खिशाला चाप बसलेल्या मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.

Updated: Jun 24, 2014, 04:41 PM IST
मुंबई मेट्रोचे नवीन दर  ९ जुलैपासून लागू title=

मुंबई : रेल्वे भाडेवाढीमुळं खिशाला चाप बसलेल्या मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.

आता नवीन दरानुसार मेट्रोच्या प्रवासासाठी किमान १० तर कमाल ४० रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारनं नेमलेल्या भाडेवाढी संदर्भातल्या समितीचा अहवाल येईपर्यंत रिलायन्सची भाडेवाढ कोर्टानं वैध ठरवली आहे. रिलायन्ससोबत झालेल्या करारानुसार मेट्रोचे जने दर सरसकट दहा रुपये होते.

आता कोर्टाच्या निर्णयामुळं रिलायन्सला दरवाढवण्याची मुभा मिळाल्यामुळं मुंबईकरांना लोकलपाठोपाठ मेट्रोच्या प्रवासासाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.