उद्धव ठाकरेंना 'मनसे' शुभेच्छा!

उद्धव आणि राज ठाकरे या बंधुंमधली कटुता संपून त्यांच्यातल्या नात्यातला जिव्हाळा आज पुन्हा दिसला. शिवसेना सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच राज ठाकरे यांनी उद्धव यांना आज वाढदिवसाला पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्यात.

Updated: Jul 27, 2012, 04:10 PM IST

www.24taas.com, मुंबई

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधुंमधली कटुता संपून त्यांच्यातल्या नात्यातला जिव्हाळा आज पुन्हा दिसला. शिवसेना सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच राज ठाकरे यांनी उद्धव यांना आज वाढदिवसाला पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्यात.

 

उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा राज दीर्घकालावधीनंतर प्रथमच त्यांना भेटायला रुग्णालयात गेले. दोन्ही बंधुंचे कुटुंबीयही त्यानिमित्तानं एकत्र आले. राजकीय वादातून टोकाला गेलेली कटुता यानिमित्तानं संपुष्टात आल्याचं चित्र त्यावेळी दिसलं. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात असतानाही राज यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस करत आहेत. राज यांनी आता त्यापुढे एक पाऊल टाकत उद्धव यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्यात. दोन्ही बंधुंमध्ये राजकारणामुळे आलेला दुरावा कमी होऊन मनानं जवळ येण्याची ही सुरुवात झाल्याचं चित्र या निमित्तानं पुढे आलंय.