मुंबईत ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी

मुंबईतील मंत्रालयातली आग विझवतांना पाण्याची कमतरता स्पष्टपणे जाणवत होती. कारण मुंबईतील ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी झाले आहेत.

Updated: Jun 24, 2012, 02:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील मंत्रालयातली आग विझवतांना पाण्याची कमतरता स्पष्टपणे जाणवत होती. कारण मुंबईतील ९० टक्के फायर हायड्रन्ट निकामी झाले आहेत.

 

गुरुवारी मंत्रालयाला लागलेली आग मंत्रालयातली अग्निशमन यंत्रणा किती कुचकामी होती हे उघड झालंच होतं. पण आता त्यात आता या नव्या माहितीची भर पडलीय. केवळ याच परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण मुंबईतली ९० टक्के हायड्रन्ट बंद आहेत मंत्रालय महानगर पालिकेच्या ए वॉर्डमध्ये येतं. या वॉर्डात एकूण ८९५ फायर हायड्रन्ट आहेत त्यापैकी ६६५ हायड्रन्ट बंद आहेत.

 

मुंबई शहरातल्या १० हजार २२०  पैकी९१७२  हायड्रन्टस बंद आहेत. हे नळखांब मुख्य जलवाहिनीला जोडलेले असतात. मुंबईत सुरु असलेल्या विकासकामांचा फटका या नळखांबांनाही बसलाय. त्यामुळे जर मुंबईत एखादी मोठी आग लागली तर ती विझवताना या निकामी नळखांबांकडे हताशपणे पाहणंच हाती राहील. यावरूनच मुंबई आगीपासून किती सुरक्षित आहे हे स्पष्ट होत आहे.