झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबई महापालिकेतील 227 नगरसेवकांपैकी 82 नगरसेवकांनी पाच वर्षात मुंबईच्या प्रश्नावर पालिकेच्या सभागृहात चर्चा केल्याच उघड झालं.तर 145 नगरसेवक मौनी बाबा ठरल्याच पालिकेच्या प्रगती पुस्तकातना उघड झालं.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीचे नगारे वाजत असताना पालिकेतील 227 नगरसेवकांपैकी फक्त 82 नगरसेवकांनी पाच वर्षात मुंबईच्या प्रश्नावर पालिकेच्या सभागृहात चर्चा केल्याच उघड झालं.तर 145 नगरसेवक मौनी बाबा ठरल्याच पालिकेच्या प्रगती पुस्तकातना उघड झालं.शिवसेनेच्या 81 नगरसेवकांपैकी 29 नगरसेवक सभागृहात चर्चेत सहभागी होतात.भाजपचे 29 नगरसेवकांपैकी 18 नगरसेवक,कॉग्रेसचे 76 नगरसेवकापैकी 24 नगरसेवक,राष्ट्रवादीचे 14 नगरसेवकापैकी 5 नगरसेवक, समाजवादी पार्टीचे 7 नगरसेवकापैकी 2 नगरसेवक, तर मनसेच्या 7 नगरसेवकापैकी फक्त 1 नगरसेवक पालिकेच्या सभागृहात चर्चेत सहभागी होत असल्याच उघड झालं.
या सर्वपक्षीय नगरसेवकात शिवसेनेचे मोहन चोंडकर आणि कॉग्रेसचे विनोद शेखर यांच सहभाग उत्तम असल्याच पालिकेच्या पालिकेन जाहिर केलं.मात्र मुंबईच्या महापौर बायस असल्यामुळे विरोधकांना सभागृहात बोलायला मिळत नाही असा आरोप कॉंग्रेस नगरसेवकांनी केला. मुंबईच्या महापौरानी विरोधी पक्षाच्या आरोपाच खंडन केलं.तर मुंबईच्या प्रश्नाबद्दल मोठी आस्था दाखवणारे मनसेचे नगरसेवक सभागृहात उपस्थित नसतात असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. मनसेनं पालिकेच्या प्रगतीपुस्तकावर सध्या उत्तर दिलेल नाही.मात्र 145 नगरसेवकांनी मुंबईच्या प्रश्नावर चर्चेत सहभाग न घेतल्यामुळे हे नगरसेवक नापास झाले आहेत