युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Mar 30, 2012, 02:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

 

 

सभागृहात मूर्ती आणून १४ आमदारांनी आरती केली. सभागृहाचा अवमान केल्याचा ठपका या आमदारांवर ठेवण्यात आला आहे.  प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, विनोद घोसाळकर, विजय गावडे, महादेव बाबर, राजन विचारे, बालाजी किणीकर, अभिजीत अडसूळ, दौलत दरोडा,  राजाराम चौगुले, सुजीत मंचेकर, विजय शिवतारे, चंद्रकांत मोकाटे  तर भाजपचे राम शिंदे यांचा निलंबित आमदारांत समावेश आहे.  दिवेआगार चोरीप्रकरणी आमदारांना हे आंदोलन महागात पडले आहे.

 

रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले होते.

 

विधानसभा परिसरात युतीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. आज दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.