194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास, 68 टक्के जमीन रहिवाशांसाठी!

वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. वरळीतल्या जांबोरी मैदानावर हा सोहळा पार पडला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 23, 2017, 04:03 PM IST
194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास, 68 टक्के जमीन रहिवाशांसाठी!  title=

मुंबई : वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. वरळीतल्या जांबोरी मैदानावर हा सोहळा पार पडला. 

यामध्ये बीडीडीच्या एकूण जमिनीपैकी ६८ टक्के जमीन रहिवाशांसाठी वापरली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तसंच आधीच्या सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच, आतापर्यंत बीडीडी चाळींचा पुनर्विकास रखडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

दरम्यान, दरम्यान, श्रेयासाठी सेना भाजपचं पोस्टरवॉर इथं रंगलेलं दिसलं. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळंच श्रेयाच्या लढाईत भाजप आघाडीवर दिसले.

95 वर्षे जुन्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागल्यानंतर ही श्रेय़वादाची लढाई सुरूय. भाजपनं हा सोहळा पूर्णपणे हायजॅक केला.