रेसकोर्सवर घुमणार लतादीदींचे स्वर!

मुंबईत आज महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो` हा भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो` हे गीत गाणार आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुध्दा यावेळी उपस्थिती लावणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 27, 2014, 02:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत आज महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो` हा भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो` हे गीत गाणार आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुध्दा यावेळी उपस्थिती लावणार आहेत.
लतादीदींनी २७ जानेवारी १९६३ला हे गीत गायलं होतं. या गीताला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लष्करी पदक सन्मानित ५० अधिकारी उपस्थित रहाणार आहे. तसंच १० हजार माजी सैनिक तसंच शहीद सैनिकांचे नातेवाईक उपस्थित रहाणार आहेत.
विशेष म्हणजे मरणोत्तर परमवीरचक्र सन्मानित अब्दूल हमीद यांच्या परिवारातील आठ सदस्य उपस्थित राहणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.