'दंगल'साठी भागवतांच्या हस्ते आमिर खानचा सन्मान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेता आमिर खानला 'दंगल' चित्रपटासाठी सन्मानित केलं गेलं

Intern Intern | Updated: Apr 25, 2017, 01:28 PM IST
'दंगल'साठी भागवतांच्या हस्ते आमिर खानचा सन्मान title=

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेता आमिर खानला 'दंगल' चित्रपटासाठी सन्मानित केलं गेलं. 

मुंबईमध्ये सोमवारी (२४ एप्रिल) झालेल्या मास्टर दिनानाथ मंगेशकर अॅवॉर्ड समारंभामध्ये मोहन भागवतांच्या हस्ते आमिर खानला दंगल चित्रपटात त्याने केलेल्या कामासाठी सन्मानित केलं गेलं. 

या चित्रपटात आमिरने मल्ल महावीर फोगट यांची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन नितीश तिवारी यांनी केले आहे. २३ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच या चित्रपटात आमिरसोबत साक्षी तंवर आणि राजकुमार राव या अभिनेत्यांनीही प्रमुख भूमिका निभावल्या आहेत.