मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अरविंद केजरीवाल हे आपली बाजू मांडण्याकरता न्यायालयात हजर राहणार आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मानखुर्द भागात आम आदमी पार्टीनं कोणतीही पूर्व परवानगी न घेता एक जाहीर सभा घेतली होती. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एफआईआर दाखल करण्यात आलाय.
तर ही रॅली आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने आयोजित केली होती त्यासाठी केजरीवाल यांना जबाबदार धऱण्यात येऊ नये आणि त्यांना कोर्टात हजर राहण्यापासून सूट मिळावी, असं केजरीवालांचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितलं होतं.
मात्र, जस्टिस आर व्ही मोरे यांनी या सर्व घटनेला केजरीवालही तितकेच दोषी आहेत असं मत नोंदवत दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच कुर्ला मैजिस्ट्रेट कोर्टात हजर राहून कायमचा दिलासा घेण्याचा सल्ला दिला होता.