आशिष शेलार यांचा पुन्हा पारदर्शकतेवरून डिवचण्याचा प्रयत्न

 अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.  यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 1, 2017, 06:26 PM IST
 आशिष शेलार यांचा पुन्हा पारदर्शकतेवरून डिवचण्याचा प्रयत्न  title=

मुंबई :  अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.  यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून मुंबई मनपा सत्ताधारी शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र अर्थ मंत्रालयाने मुंबई मनपाचा कारभार पारदर्शक असल्याचं प्रशस्तीपत्र दिल्याने भाजपच्या मुद्द्यातलीच हवा निघून गेली आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. 

त्यावर बोचरी टीका करताना शेलार म्हणाले, हा रिपोर्ट बघून जे स्वतःची पाठ खाजवण्याचा प्रयत्न करत आहे, एक प्रकारे त्यांची बालबुद्धी जाहीर करत आहेत. 

जनतेने आता पारदर्श विषयावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे तेव्हा बुडत्याला  काठीचा आधार  म्हणून पालिकेतील नेते त्यावर आता ( अहवालावरून ) पोपटपंचची करायला लागले आहेत, असे शेलार यांनी म्हटले आहे. 


या निवडणूकमध्ये पारदर्शी कारभार हाच निवडणूक मध्यें मुख्य असेल हे यावरून स्पष्ट होते.  ही क्लीन चिट नव्हे, जे घाबरले आहेत ते बुडत्याला काडीचा आधार असे करत आहेत, असे शेलार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

चार निकषवर स्वतःची तुलना गरीब असलेल्या महापालिका बरोबर करत आहेत.
जगात मुंबई महापालिका 50 व्या क्रमांकावर आहे याचे पाप शिवसेना नेतृत्वाला डोक्यावर घ्यावे लागेल. सेनेचे बोलणे म्हणजे मंत्रापेक्षा थुकी जास्त, असे असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. 

पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डींग्ज शहरात लावण्याची शिवसेनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे ज्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते. तोच मुद्दा आता मुख्यमंत्री आणि भाजपला मुंबई पालिका निवडणुकीत अडचणीचा ठरणार आहे. शिवसेनेला भाजपविरोधात आता अधिक रान उठविण्याची आयती संधी मिळाली आहे.