मुंबई : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि मुंबई पोलिसांची झोपच उडालेय. ऐन सणाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या निवडणुका आणि दहशतवादी संघटनेकडून आलेली धमकी, त्यामुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून पाहारा द्यावा लागणार आ
राज्यात 16 वी विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वच पक्ष कामाला लागलेत. पण, यात खरी कसोटी आहे ती, मुंबई पोलिसांची नुकतचं गणेशोत्वस संपलाय आणि आता निवडणुका त्यात याच महिन्यात दसरा, नवरात्र, दिवाळी सारखे मोठे सण आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची झोपचं उडाली आहे.
हे कमी म्हणून की, काय अल कायदा सारख्या मोठ्या दहशतवादी संघटनेनं मुंबईत घातपात घडवण्याची दिलेली धमकी यामुळे तर मुंबई पोलिसांना आता चोवीस तास पाहारा द्यावा लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.