पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे

राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे. कायद्याची वचक बसली  पाहिजे. यासाठी हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

Updated: Sep 7, 2016, 06:13 PM IST
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे title=

मुंबई : राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे. कायद्याची वचक बसली  पाहिजे. यासाठी हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

राज्यातील पोलिसांवर दिवसागणिक वाढ होत आहे. याबाबत पोलिसांच्या कुटुंबसहित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी हल्ले रोखण्यासाठी आणि त्याची चौकशी होण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची विनंत केली. कारण राज्यतला पोलीस सुरक्षित असलाच पाहिजे, असे सांगून आमच्या बहुतेक मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत, असे ते म्हणालेत.

ज्यांच्यावर इतरांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्यावरच हल्ले होताना दिसत असून कायद्याच्या रक्षमकर्त्यांनाच आता सुरक्षा देण्याची वेळ ओढावली आहे. सर्वांना कायद्याचा धाक असला पाहिजे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना, हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे उद्धव यांनी बैठकीनंतर सांगितले. 

हल्लेखोरांवर कारवाई होणार : दीपक केसरकर

कल्याणच्या पोलीस हल्ल्य़ाप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई होणार, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला पक्ष किवा कुठल्याही कारणाने माफ करणार नाही, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 'झी मीडिया'शी बोलतांना सांगितले आहे. त्याप्रमाणे यापुढील काळात पोलिसांचे मनोधैर्य कसे वाढेल याचीही काळजी घेऊ, असे केसरकर म्हणालेत.

ही सामाजिक विकृती : जलसंपदा मंत्री महाजन

गणपती विसर्जनावेळी पोलीस निरीक्षकाला तलावात बुडवून मारण्याचा प्रकार हा सामाजिक विकृती असल्याची टीका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कल्याण मध्ये घडलेल्या घटनेबद्दल केलीय. पोलीस हे आपल्याच संरक्षसासाठी असतात त्यामुळे नागरिकांनीही ही बाब ध्यानात घेतली पहिजे असेही महाजन म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ही घटना अतिशय गंभीरपणे घेतली असून याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुढे अशा घटना होणार नाहीत याची खबरदारी सरकार घेईन, अशीही ग्वाही गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.