मुंबई : वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत आली आहे.
तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव यांची सभा वांद्र्यात होते आहे. ओवेसी बंधुनी केलेली टीका आणि नारायण राणे यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी हे दोघं काय बोलतात, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.
शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच होणाऱ्या जाहीर सभेमुळे गतनिवडणुकीतील भाजपची ३५००० मते सेनेला मिळून शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा आहे, अशी चर्चा आहे.
काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उतरणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर प्रचार सभेमुळे आता निवडणुकीत खरी रंरगत आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.