मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.

Updated: Aug 26, 2016, 07:42 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील फास्ट ट्रकवर रुळाला तडे गेल्याने फास्ट वाहतूक स्लो ट्रकवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटाने सुरु आहे. स्लो मार्गावर वाहतूक वळविल्याने याचा ताण या मार्गावर पडलाय. घरी जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.