मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची लोकल सेवा सुरळीत

मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर ते आंबिवली दरम्यान ओव्हरडेह वायर तुटल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा तब्बल सात तासाने सुरळीत झाली. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे - वाशी लोकल सेवा सुरळीत झाली आहे.

Updated: Nov 26, 2016, 12:42 PM IST
मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची लोकल सेवा सुरळीत title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर ते आंबिवली दरम्यान ओव्हरडेह वायर तुटल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा तब्बल सात तासाने सुरळीत झाली. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे - वाशी लोकल सेवा सुरळीत झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर ते आंबिवली दरम्यान ओव्हरडेह वायर तुटल्याने पहाटे 4.45 वाजल्यापासून अनेक लोकल्स आणि लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या होत्या. काही गाड्या खडवली रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या. यात मालमाहतूक करणाऱ्याही गाडीचा समावेश होते.

तब्बल सात तासानंतर मध्य रेल्वेची सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र, ही सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.