महाडची घटना दुर्दैवी, पाऊसामुळे बचावकार्यात अडथळे - मुख्यमंत्री

रायगड जिल्ह्यात महाड दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेतलीय. 

Updated: Aug 3, 2016, 12:26 PM IST
महाडची घटना दुर्दैवी, पाऊसामुळे बचावकार्यात अडथळे - मुख्यमंत्री title=

रायगड : रायगड जिल्ह्यात महाड दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेतलीय. 

मुंबई - गोवा महामार्गावर महाड इथं सावित्री नदीवरचा एक पूल कोसळल्यानं दोन बससहीत एक चार चाकी गाडीही बेपत्ता आहे. 

यामध्ये, ड्रायव्हर, कन्डक्टरसहीत २२ लोक वाहून गेलेत. एनडीआरएफनं रेस्क्यू अॅन्ड रिलीफ ऑपरेशन सुरू केलंय, परंतु, पाऊस सुरूच असल्यानं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. 

पंतप्रधानांशी चर्चा.... 

या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: दखल घेतलीय... याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिलीय. तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधलाय. आवश्यक ती सर्व मदत केंद्राकडून मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.