तर मग तेव्हा बाळासाहेबांना का सोडून गेले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना कडक शब्दात उत्तर दिलं आहे.

Updated: Feb 3, 2014, 06:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना कडक शब्दात उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, `बाळासाहेबांची एवढी चिंता असती, तर जिवंतपणी ते बाळासाहेबांना सोडून गेले नसते`, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुंबईत नुकतीच सभा घेतली.
या सभेत त्यांनी बाळासाहेबांच्या नाव घेतलं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती.
नरेंद्र मोदींवरील या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मनसेला राज्यात स्थान उरलेलं नाही, असंही बोलायला देवेंद्र फडणवीस विसरलेले नाहीत.
पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, तेव्हापासून भाजप आणि मनसेत खडाखडी सुरू झाली आहे.
राज ठाकरे एकेकाळी भाजपने गुजरातमध्ये कसा विकास केला आहे, अशी उदाहरण जाहीर सभांमधून देत होते.
मात्र तेच राज ठाकरे आज भाजपवर टीका करतायत, यावरून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.