www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठी कवितेतील प्रतिभाशाली साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ अखेर अनंतात विलीन झाले.
ढसाळ यांच्या पार्थिवावर चैत्यभूमी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जांबुवंतराव धोटे, कवयित्री नीरजा, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अविनाश महातेकर, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, अरुण खोरे, ज. वि. पवार आदींनी उपस्थित राहून नामदेव ढसाळांना आदरांजली वाहिली.
नामदेव ढसाळ यांचं बुधवारी पहाटे बॉम्बे रुग्णालयात निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने दलित साहित्यात मोठी पोकळी निर्माण झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.