कुर्ल्यातील झोपडपट्टीला आग

कुर्ला येथील कपाडियानगरजवळ झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली होती. सात ते आठ झोपडपट्ट्यांना ही आग लागली.

Updated: Jan 7, 2017, 09:19 AM IST
कुर्ल्यातील झोपडपट्टीला आग title=

मुंबई : कुर्ला येथील कपाडियानगरजवळ झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली होती. सात ते आठ झोपडपट्ट्यांना ही आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या... अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

या आगीत कोणतीही जीवीत हानी झाल्याचं वृत्त आतापर्यंत समोर आलेलं नाही. मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.