झंडा ऊंचा रहे हमारा...

देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू झालीय... सूर्यकिरणांच्या प्रकाशात तिरंगा फडकताना दिसला की आपली मान अभिमानाने उंचावते... हाच तिरंगा वर्षानुवर्षं फडकत राहावा यासाठी अनेक हात काम करतायत. 

Updated: Aug 9, 2014, 10:26 AM IST
झंडा ऊंचा रहे हमारा... title=

मुंबई : देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू झालीय... सूर्यकिरणांच्या प्रकाशात तिरंगा फडकताना दिसला की आपली मान अभिमानाने उंचावते... हाच तिरंगा वर्षानुवर्षं फडकत राहावा यासाठी अनेक हात काम करतायत. 

1996 पासून मुंबईतच नव्हे तर देशभरात तिरंगा पोहचवण्याचं काम फ्लॅग शॉप करतंय. सध्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने झेंडा बनवण्याच्या कामाला वेग आलाय. पॉलिस्टरचं कापड आणि रंग हे या दुकानातलं वैशिष्ट्य.... पॉलीस्टरच्या कापडाचं वजन कमी असल्यानं हवा आली की हा झेंडा लगेच फडफडतो... म्हणूनच या ठिकाणच्या झेंड्यांना विशेष मागणी आहे. मुंबई हायकोर्ट, कॉन्सूलेट, सरकारी कार्यालयं इतकंच नाही तर रतन टाटा, यश राज फिल्म्स, भाग मिल्खा भाग, कल हो ना हो, किक अशा अनेक सिनेमांमध्ये इथला तिरंगा फडकलाय, असं या दुकानाचे मालक प्रशांत शहा सांगतात. 

या ठिकाणी 2 बाय 3 फूट ते 80 बाय 120 फूटपर्यंत झेंडे बनवले जातात. ज्याची किंमत 50 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. सुरुवातीला हा उद्योग सुरु केल्यावर दोन वर्षातच तो बंद पडला होता पण दुकानमालक शहा यांनी हिंमत न हारता तो पुन्हा सुरु केला आणि सुरुवातीला वर्षाला फक्त 30 हजार रुपये इतकाच टर्न ओव्हर असलेल्या या उद्योगाचा आता 2 कोटींचा टर्न ओव्हर आहे. 
 
झेंडा खरेदी करण्यापासून ते झेंडा सांभाळण्यापर्यंत अनेक गोष्टी झेंडे तयार करताना लक्षात घ्याव्या लागतात. झेंडा हाताळताना त्याचे नियम पाळावे लागतात. पण, या सगळ्यापेक्षा झेंडा बनवल्यानंतर आपण स्वतः तयार केलेला झेंडा फडकताना पाहण्याचा आनंद सगळ्यात मोठा असतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.