मुंबई : श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरुच आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय.
मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर दिसून येत आहे. पाऊस संततधार सुरुच आहे. सोमवारी दुपारी बारा वाजल्यापासून तुळशी तलाव भरुन वाहू लागलाय. गेल्या वर्षी हा तलाव 12 जुलै 2013 रोजी ओव्हरफ्लो झाला होता. श्रावणाच्या पहिल्या दिवसांपासून दमदार कमबॅक केलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही मुंबईवर कायम होता. मुंबई उपनगरातही पावसाची संततधार होती.
रविवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. मुंबई शहर परिसरात कालपर्यंत15 मिमी, उपनगरात 16 मिमी तर पूर्व उपनगरात 17 मिमी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी वाहतूक कोंडी वगळता मुंबईत रस्ते वाहतूक सुरळीत होती.
रेल्वे वाहतूकीवरही पावसाचा परिणाम जाणवला नाही. ठाण्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. ठाणे परिसरात सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु होता. दुपारनंतर मात्र मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, त्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.