मुंबई : हजार, पाचशेच्या नोटा बाद केल्याचा फटका, जेलमधील कैद्यालाही बसला आहे. कारण हजार रूपयाची नोट कोर्टात स्वीकारण्यात न आल्याने एका कैद्याचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने ड्रग्ज तस्करीप्रकरणी आकाशकुमार छाचडला १५ हजारांचा जामीन मंजूर केला आहे.
आकाशकुमारला २०१५ मध्ये त्याला ३० हजारच्या बदल्यात जामीनही देण्यात आला होता. मात्र पैसै भरण्याची ऐपत नसल्यानं छाचडनं जामीन घेतला नव्हता. ११ नोव्हेंबर २०१४ पासून छाचड मशीद बंदर जेलमध्ये आहे.