ISISमध्ये गेलेल्या आरिफला ८ डिसेंबरपर्यंत NIAकडे कोठडी

आरिफ माजीदला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून त्याला ८ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरिफची रवानगी एनआयच्या कोठडीत करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. 

Updated: Nov 29, 2014, 02:01 PM IST
ISISमध्ये गेलेल्या आरिफला ८ डिसेंबरपर्यंत NIAकडे कोठडी title=

मुंबई: आरिफ माजीदला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून त्याला ८ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरिफची रवानगी एनआयच्या कोठडीत करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. 

काल एनआयएनं आरिफला अटक केली होती. कल्याण इथले चार तरुण इराकमधील ISIS या दहशतवादी संघंटनेच्या कारवायांमध्ये सहभाग घेण्याच्या वृत्तानं खळबळ उडाली होती. त्यापैकी दहशतवादी कृत्य करताना आरिफ मजीद नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी इसीस या दहशतवादी संघटनेनंच दिली होती. पण आता आरिफ मुंबईत परत आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोनं आरिफला भारतात परत आणलं असून, त्याला मुंबईतच अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं होतं. मुंबई आणि ठाणे एटीएसचे अधिकारी त्या चौकशी टीममध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

गेल्या मे महिन्यात कल्याणमधील आरिफ एजाज महम्मद ऊर्फ गुड्डू, अमन तांडेल, सलीम तानकी आणि फहर शेख असे चौघे तरूण गायब झाले होते. त्या चौघांनाही तपास यंत्रणांनी फरार घोषित केलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.