सेनेचे आमदार-खासदार संपर्कात - माणिकराव ठाकरे

शिवसेनेचे अनेक आमदार-खासदार आणि नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2013, 09:27 AM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनेचे अनेक आमदार-खासदार आणि नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता आलीय.त्यामुळं नजीकच्या काळात शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता माणिकरावांनी वर्तवलीय.

माणिकराव यांच्या गौप्यस्फोटानंतर कोणते नेत काँग्रेसच्या संपर्कात आहेत, याची कुजबुज सुरू झाली आहे. ठाकरेंनी हे विधान आताच का केले, याचीही चर्चा सुरू आहे.