डॉनच्या नातेवाईक लग्नसोहळ्यात मंत्री, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 25, 2017, 08:15 PM IST

डॉन दाऊदच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला भाजप मंत्र्यांची उपस्थिती

मुंबई : कुख्यात डॉन दाऊदच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिलेत.

तसेच देशभरातले बुकी आणि इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेही या लग्नात सहभागी झाले होते, अशी चर्चा आहे. तर नाशिकमधले ८ पोलीस अधिकारी कर्मचा-यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. आता याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. दुपारी चार पर्यंत अहवाल देण्याची मुदत देण्यात आली. 

दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊद संबंधांवरून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या भाजप पक्षाचे जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांनी दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात हजेरी लावली ही गंभीर बाब आहे. त्यामुळे महाजन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलीय.