केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेकडून तीन नावे?

केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे. शिवसेनेला मंत्रिपद देण्याची  भाजपने तयारी दाखविली आहे. तुमच्याकडील नावे देण्यासाठी भाजपकडून विचारणा करण्यात आली. मात्र, शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. महाराष्ट्रातील तिढा जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत सहभागाबाबत सेनेकडून सांगण्यात येत नव्हते. दरम्यान, सेनेकडून तीन जणांच्या नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Updated: Nov 8, 2014, 01:08 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेकडून तीन नावे? title=

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे. शिवसेनेला मंत्रिपद देण्याची  भाजपने तयारी दाखविली आहे. तुमच्याकडील नावे देण्यासाठी भाजपकडून विचारणा करण्यात आली. मात्र, शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. महाराष्ट्रातील तिढा जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत सहभागाबाबत सेनेकडून सांगण्यात येत नव्हते. दरम्यान, सेनेकडून तीन जणांच्या नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराठी आपल्या उमेदवारांची यादी दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून तीन नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये सेना सहभागी होणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, प्रतापराव जाधव यांची नावे चर्चेत आहेत. केंद्रात सत्तेत शिवसेनेला सहभागी होणार असल्याने राज्यातील तिढा सुटण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप-सेना युती होण्याची चर्चा सुरु झाली आहे. तर भाजपने स्वच्छ प्रतिमेचे माजी मंत्री सुरेश प्रभू यांना मंत्रीपद देण्यासाठी आग्रह धरला आहे. परंतु सेनेकडून त्यांच्या नावाला विरोध होत आहे. तुमच्या कोट्यातून त्यांना जागा देत असाल तर द्या. त्याचा संध्या सेनेशी संबंध नाही, असे सेनेच्या गोठातून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रीपद स्वीकारण्यासाठी शिवसेनेनं भाजपला अटी घातल्यात. जनतेशी निगडीत खातं द्या, अशी मागणी शिवसेनेनं केलीय. जनतेशी निगडीत खातं मिळालं तरच केंद्रात मंत्रीपद स्वीकारणार, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातही विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करा, अशी अट शिवसेनेनं घातलीय.

येत्या रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणाराय. त्यापाठोपाठ सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. शिवसेनेची ही भूमिका लक्षात घेता, आता शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.