मुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला शपथ घेण्याची शक्यता

भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Updated: Oct 26, 2014, 10:09 PM IST
मुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला शपथ घेण्याची शक्यता title=

मुंबई: भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित झाला की लगेचच बुधवारी किंवा गुरूवारी मुख्यमंत्र्यांसह चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल, अशी शक्यता आहे. 

यात प्रामुख्यानं एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारणतः आठवड्याभरात पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.