मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये समाजाचे आणि संस्कृतीचे ठेकेदार काही महाविद्यालयीन तरुणींना मारहाण करतेवेळी चित्रीत करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल होतोय.
मुंबईच्या बांद्रा स्कायवॉकवर बसलेल्या काही कपल्सला मारहाण करताना काही 'संस्कृती ठेकेदार' या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. स्वत:ला सामाजिक कार्येकर्त म्हणवून घेणारे हे लोक मुलींना पकडून त्यांना त्यांच्या पालकांचे नंबर मागताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत... त्यांना विरोध करणाऱ्या काही मुलांना आणि मुलींनाही ते मारहाण करताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, आत्तापर्यंत कुणीही याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही. पण, याप्रकारचं दृश्यं बांद्रा स्कायवॉकवर अनेकदा पाहायला मिळत असल्याचं सांगितलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.